भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४९ :
भारतीय नाणे निराळ्या वर्णनाचे नाणे म्हणून खपून जावे या उद्देशाने त्याचे रूप बदलणे :
(See section 178(5) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय नाणे निराळ्या वर्णनाचे नाणे म्हणून खपून जावे या उद्देशाने त्या नाण्याचे रुप बदलणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी १.(कोणत्याही भारतीय नाण्यावर) उक्त (सदरचे) नाणे निराळ्या (वेगळ्या) वर्णनाचे नाणे म्हणून खपून जावे या उद्देशाने त्यावर ज्यामुळे त्या नाण्याचे रूप बदलेल अशी कोणतीही क्रिया करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनच्या नाण्यांपैकी कोणत्याही नाण्यावर याऐवजी समाविष्ट करण्यात आले.