भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४७ :
कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने भारतीय नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे :
(See section 178(5) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कपटीपणाने भारतीय नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने १.(कोणत्याही भारतीय नाण्यावर) ज्यामुळे त्या नाण्याचे वजन कमी होते किंवा मिश्रण बदलते अशी कोणतीही क्रिया करील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनच्या नाण्यांपैकी कोणत्याही नाण्यावर याऐवजी समाविष्ट करण्यात आले.