Ipc कलम २४६ : कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४६ :
कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे :
(See section 178(5) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कपटपणाने कोणत्याही नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने कोणत्याही नाण्यावर, ज्यामुळे त्या नाण्याचे वजन कमी होते, किंवा मिश्रण बदलते अशी कोणतीही क्रिया करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
जी व्यक्ती नाण्याचा एखादा भाग पोखरून त्या पोकळीत अन्य कोणताही पदार्थ भरते, तिने त्या नाण्याचे मिश्रण बदलले असे होते.

Leave a Reply