भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४५ :
नाणी बनवण्याचे साधन बेकायदेशीरपणे टाळसाळीतून घेऊन जाणे :
(See section 188 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नाणी बनवण्याचे कोणतेही साधन बेकायदेशीरपणे टाकसाळीतून घेऊन जाणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी १.(भारतात) कायदेशीरपणे स्थापन झालेल्या कोणत्याही टाकसाळीतून कोणतेही नाणी बनवण्याचे हत्यार किंवा साधन कायदेशीर अधिकारपत्राशिवाय घेऊन जाईल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० व १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.