भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४३ :
एखाद्या व्यक्तीने भारतीय नाणे कब्जात बाळगणे ते कब्जात आले तेव्हा ते नकली असल्याचे तिला माहीत असल्यास:
(See section 180 (Explanation) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीने भारतीय नाणे कब्जात बाळगणे – ते नाणे कब्जात आले तेव्हा ते नकली असल्याचे तिला माहीत असल्यास.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जे नकली नाणे १.(भारतीय नाण्याची) नक्कल असेल ते कब्जात आले त्या वेळी ते नकली होते हे स्वत:ला माहीत असून जो कोणी ते नकली नाणे कपटीपणाने किंवा कपट करता यावे या उद्देशाने कब्जात बाळगील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.