भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४२ :
एखाद्या व्यक्तीने नकली नाणे कब्जात बाळगणे, ते कब्जात आले तेव्हा ते नकली असल्याचे तिला माहीत असल्यास :
(See section 180 (Explanation) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीने नकली नाणे कब्जात बाळगणे – ते नाणे कब्जात आले तेव्हा ते नकली असल्याचे तिला माहीत असल्यास.
शिक्षा :३ वर्षांपर्यंतचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
जे नकली नाणे कोणत्याही नाण्याची नक्कल असेल ते कब्जात आले त्या वेळी ते नकली होते हे स्वत:स माहीत असून जो कोणी ते नकली नाणे कपटीपणाने किंवा कपट करतो यावे या उद्देशाने कब्जात बाळगील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.