Ipc कलम २४१ : एखादे नाणे खरे म्हणून सुपूर्द (हवाली) करणे, ते जेव्हा प्रथम कब्जात आले तेव्हा सुपूर्द (हवाली) करणाऱ्यास ते नकली असल्याचे माहीत नसल्यास:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४१ :
एखादे नाणे खरे म्हणून सुपूर्द (हवाली) करणे, ते जेव्हा प्रथम कब्जात आले तेव्हा सुपूर्द (हवाली) करणाऱ्यास ते नकली असल्याचे माहीत नसल्यास:
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही नकली नाणे अन्य व्यक्तीकडे खरे म्हणून समजूनसवरुन सुपूर्द करणे ते जेव्हा प्रथम कब्जात आले तेव्हा सुपूर्दकाराला ते नकली असल्याचे माहीत नसल्यास.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास किंवा नकलीकरण केलेल्या नाण्याच्या मूल्याच्या दहापट पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्हीही
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जे कोणतेही नकली नाणे नकली असल्याचे स्वत:ला माहीत आहे परंतु जे आपल्या कब्जात घेतले तेव्हा ते नकली असल्याचे स्वत:ला माहीत नव्हते, असे कोणतेही नाणे जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीकडे अस्सल म्हणून सुपूर्द (स्वाधीन) करील किवां अन्य कोणत्याही व्यक्तीस ते अस्सल म्हणून स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा नकलीकरण केलेल्या नाण्याच्या मूल्याच्या दहा पटीपर्यंत असू शकेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
(क) हा नाणेकार कंपनीचे नकली रुपये चालवण्यासाठी ते (ख) या आपल्या सह अपराध्याकडे सुपूर्द करतो. (ख) ते रुपये (ग) या दुसऱ्या नाणी चालवणाऱ्या माणसाला विकतो व तो ते नकली असल्याचे माहीत असताना विकत घेतो. (ग) मालाचे पैसे म्हणून ते रुपये (घ) ला देऊन टाकतो व तो ते नकली असल्याचे माहीत नसताना स्वीकारतो. ते स्वीकारल्यानंतर (घ) ला ते नकली असल्याचे लक्षात येते आणि ते जणू काही विधिग्राह्य असावेत त्याप्रमाणे देऊन टाकतो. या बाबतीत (घ) फक्त या कलमाखाली शिक्षापात्र आह, पण (ख) व (ग) हे, कलम २३९ किंवा, प्रकरणपरत्वे, २४० खाली शिक्षापात्र आहेत.

Leave a Reply