भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३९ :
कोणतेही नाणे नकली आहे याची जाणीव असताना ते सुपूर्द करणे :
(See section 179 and 180 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही नकली नाणे ते कब्जात आले तेव्हा तसे असल्याचे माहीत असताना ठेवून घेणे आणि ते कोणत्याही व्यक्तीला देणे.
शिक्षा :५ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
स्वत:च्या कब्जात असलेले कोणतेही नकली नाणे ज्या वेळी आपल्या कब्जात आले त्या वेळी ते नकली नाणे असल्याचे माहीत असताना जो कोणी कपटीपणे किंवा कपट करणे शक्य व्हावे या उद्देशाने कोणत्याही व्यक्तीकडे ते सुपूर्द (हवाली) करेल किंवा ते स्वीकारण्यास कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.