भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३७ :
नकली नाण्याची आयात किंवा निर्यात :
(See section 179 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नकली नाण्याची आयात किंवा निर्यात – ते नकली असण्याचे माहीत असताना.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणतेही नकली नाणे, ते नकली आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना १.(भारतामध्ये) आयात करील अथवा तेथून निर्यात करील त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० व १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.