भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३६ :
भारताबाहेर नाण्याचे नकलीकरण करण्यास भारतामध्ये अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारताबाहेर नाण्याचे नकलीकरण करण्यास भारतामध्ये अपप्रेरणा देणे.
शिक्षा :भारतामध्ये नकलीकरण करण्यास चिथावणी देण्याप्रमाणे.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——
जो कोणी १.(भारतामध्ये) असताना १.(भारताबाहेर) नाण्याचे नकलीकरण करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, जणू काही त्याने १.(भारतात) अशा नाण्याचे नकलीकरण करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) दिलेली असावी अशा प्रकारे शिक्षा होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० व १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.