Ipc कलम २३४ : भारतीय नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे किंवा विकणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३४ :
भारतीय नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे किंवा विकणे :
(See section 181 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे, विकत घेणे किंवा विकणे.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी एखादा साचा किंवा साधन हे, १.(भारतीय नाणे) नकली तयार करण्यासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी, किंवा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना बनवील किंवा नीट करील अथवा ते बनवण्याच्या किंवा नीट करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील अथवा ते विकत घेईल, ते विकेल किंवा त्याची वासलात लावील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply