भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३२ :
भारतीय नाणे नकली तयार करणे :
(See section 178 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय नाणे नगली तयार करणे किंवा असे नाणे नकली तयार करण्याच्या प्रक्रियो कोणताही भाग पार पाडणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी १.(भारतीय नाणे) नकली तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील त्याला २.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची याद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.