भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३१ :
नाणे नकली तयार करणे:
(See section 178 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नाणे नकली तयार करणे किंवा नकली नाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचा कोणताही भाग पार पाडणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
फसगत करण्याच्या उद्देशाने अगर त्यामुळे फसगत होणे संभवनीय आहे हे माहीत असताना जी व्यक्ती अस्सल नाणे हे वेगळ्या नाण्यासारखे दिसण्याची व्यवस्था करील ती व्यक्ती हा अपराध करते.