Ipc कलम २३० : नाणे याची व्याख्या :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १२ :
नाणी व शासकीय मुद्रांक यासंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम २३० :
नाणे याची व्याख्या :
(See section 178 of BNS 2023)
१.(नाणे म्हणजे त्या त्या काळी पैसा म्हणून वापरला जाणारा आणि याप्रमाणे वापरला जावा म्हणून एखाद्या देशाच्या किंवा सार्वभौम सत्तेच्या अधिकारानुसार छाप मारलेला व चलनात आणलेला धातू आहे.)
२.(भारतीय नाणे म्हणजे पैसा वापरला जावा यासाठी जो भारत सरकारच्या प्राधिकारान्वये छाप मारलेला व चलनात आणलेला असेल तो धातू होय आणि अशा रीतीने छाप मारलेला व चलनात आणलेला धातू, तो पैसा म्हणून वापरण्याचे बंद झालेले असेल तरी, या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ भारतीय नाणे असल्याचे चालू राहील. )
उदाहरणे :
क) कवड्या ही नाणी नव्हेत.
ख) छाप नसलेले तांब्याचे तुकडे पैसा म्हणून जरी वापरले तरी ती नाणी नव्हेत.
ग) पदके ही पैसा म्हणून वापरण्याचा उद्देश नसतो, म्हणून ती नाणी नव्हेत.
घ) ज्या नाण्याला कंपनीचा रुपया असे म्हटले जाते ते ३.(भारतीय नाणे) होय.
४.(ङ) भारत सरकारच्या प्राधिकारान्वये पूर्वी जो पैसा म्हणून वापरला जात होता तो फरुखाबादी रुपया हा आता तसा वापरण्यात येत नसला तरी ते ३.(भारतीय नाणे) आहे.
——–
१. १८७२ चा अधिनियम १९ – कलम १ द्वारे मूळ पहिल्या परिच्छेदाऐवजी हा परिच्छेद दाखल करण्यात आला.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे पूर्वीच्या परिच्छेदाऐवजी हा परिच्छेद दाखल करण्यात आला.
३. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १८९६ चा अधिनियम ६ – कलम १ (२) द्वारे या खंडाची भर घालण्यात आली.

Leave a Reply