Ipc कलम २१७ : व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला समपहरणापासून (मालमत्तेच्या जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याच्या निदेशाची (आदेशाची) अवज्ञा करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २१७ :
व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला समपहरणापासून (मालमत्तेच्या जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याच्या निदेशाची (आदेशाची) अवज्ञा करणे :
(See section 255 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला समपहरणापासून वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याच्या निदेशाची अवज्ञा करणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
जर कोणी लोकसेवक असून, त्याने लोकसेवक म्हणून कसे वर्तावे (वागावे) याविषयी कायद्याने दिलेल्या निदेशाची (मार्गदर्शनाची) त्याने जाणीवपूर्वक अवज्ञा केली आणि त्यायोगे एखाद्या व्यक्तीला वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवण्याचा त्याचा उद्देश असेल किंवा त्यायोगे ती व्यक्ती वाचण्यास किंवा ती व्यक्ती ज्या शिक्षेला पात्र असेल त्या शिक्षेहून कमी शिक्षेस ती पात्र ठरण्यास आपण कारण होऊ अशी त्यास जाणीव असेल अथवा एखादी मालमत्ता विधित: (कायद्यानुसार) ज्यास दायी असेल त्या समपहणापासून (जप्तीपासून) किंवा अन्य प्रभारापासून ती वाचण्याचा त्याला उद्देश असेल किंवा त्यायोगे ती वाचवण्यास आपण कारण होणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल, तर त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply