Ipc कलम २१२ : अपराध्याला आसरा देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २१२ :
अपराध्याला आसरा देणे :
(See section 249 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला आसरा देणे – अपराध देहांतदंड असल्यास.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
अपराध : १० वर्षाच्या नव्हे तर १ वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा : अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका व तशा वर्णनाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जेव्हाकेव्हा एखादा अपराध घडलेला असेल तेव्हा, एखादी व्यक्ती अपराधी आहे हे स्वत:ला माहित असून, किंवा तसे समजण्यास कारण आहे असे असताना तिला वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवण्यासाठी जो कोणी तिला आसरा देईल किंवा लपवील त्याला –
अपराध देहांतदंड असल्यास :
जर तो अपराध मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल तर पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंडासही तो पात्र होईल ;
आजीवन कारावासाच्या किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास :
आणि जर तो अपराध १.(आजन्म कारावासाच्या) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शेकल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
आणि जर अपराध एक वर्षपर्यंत असू शकेल पण दहा वर्षेपर्यंत नव्हे इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल, तर त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्यांपैकी सर्वाधिक मुदतीच्या एक चतुर्थांशापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील .
२.(या कलमामध्ये अपराध या शब्दात ३.(भारताबाहेरील) कोणत्याही ठिकाणी करण्यात आलेली जी कृती ३.(भारतात) केली तर, पुढीलपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षेस पात्र ठरू शकेल तिचा समावेश आहे, ती कलमे अशी – ३०२, ३०४, ३८२, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४०२, ४३५, ४३६, ४४९, ४५०, ४५७, ४५८, ४५९ व ४६० आणि अशी प्रत्येक कृती जणू काही आरोपी व्यक्तीने ती कृती २.(भारतात) केल्याबदल तो दोषी असावा त्याप्रमाणे शिक्षेस पात्र आहे, असे या कलमाच्या अर्थाकरिता मानले जाईल.)
अपवाद :
ज्या प्रकरणात (घटनेत) अपराधी व्यक्तिला तिचा पती किंवा पत्नी यांनी आसरा दिलेला असेल किंवा लपवले असेल अशा कोणत्याही प्रकरणात (घटनेत) हा उपबंध (तरतूद) लागू होणार नाही.
उदाहरण :
(ख) ने दरवडा घातला आहे हे माहीत असून, (क) हा (ख) ला वैध शिक्षेपासून वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्याला लपवतो. याबाबतीत (ख) १.(आजीवन कारावासाच्या) शिक्षेस पात्र अ्रसल्याने (क) जास्तीत जास्त तीन वर्षे इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासास पात्र आहे आणि द्रव्यदंडासही पात्र आहे.
——–
१. १९५६ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप / काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १८९४ चा अधिनियम ३ – कलम ७ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
३. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply