भारतीय दंड संहिता १८६०
कलम १९६ :
खोटा असल्याचे माहीत असलेला पुरावा वापरणे :
(See section 233 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जो पुरावा खोटा किंवा रचलेला असल्याचे माहीत असेल तो न्यायिक कार्यवाहीमध्ये वापरणे.
शिक्षा :खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :असा पुरावा देण्याचा अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :खोटा पुरावा देण्याचा किंवा रचण्याचा अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जर कोणी जो खोटा किंवा रचलेला असल्याचे स्वत:स माहीत आहे असा कोणताही पुरावा खरा किंवा अस्सल पुरावा म्हणून भ्रष्टतापूर्वक वापरला किंवा वापरण्याचा प्रयत्न केला तर, त्याला जणू काही त्यानेच खोटा पुरावा दिलेला किंवा रचलेला असावा, त्याप्रमाणे त्याच रीतीने शिक्षा होईल.