भारतीय दंड संहिता १८६०
कलम १६८ :
लोकसेवकाने बेकायदेशीरपणे व्यापारधंदा करणे :
(See section 202 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने बेकायदेशीर व्यापारधंदा करणे.
शिक्षा :१ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
———
जो कोणी लोकसेवक असून आणि असा लोकसेवक म्हणून विधित: (कायद्याने) व्यापारधंदा करण्यास मनाई असताना तो तसा व्यापराधंदा करील त्यास, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.