Ipc कलम १३९ : विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३९ :
विवक्षित अधिनियमांना (कायद्यांना) अधीन असलेल्या व्यक्ती:
(See section 167 of BNS 2023)
१.(भूसेना अधिनियम, २.(भूसेना-भूसेना अधिनियम १९५० (सन १९५० चा क्रमांक ४६), नौसेना अनुशासन अधिनियम ३.( ४.(***) ५.(भारतीय नौसेना अधिनियम १९३४ (सन १९३४ चा क्रमांक ४) आता नौसेना अधिनियम १९५७ (१९५७ चा ६२)), ६.(***) ७.(वायुसेना अधिनियम किंवा ८.(वायुसेना अधिनियम सन १९५० (सन १९५० चा क्रमांक ४) यास अधीन असलेली कोणतीही व्यक्ती या प्रकरणात व्याख्या केलेल्यांपैकी कोणत्याही अपराधाबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होत नाही.
———-
१. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे क्वीनच्या भूसेनेसाठी किंवा नौसेनेसाठी असलेली अथवा अशा भूसेनेच्या किंवा नौसेनेच्या कोणत्याही भागासाठी असलेली कोणतीही सेना नियमावली याऐवजी हे दाखल करण्यात आले.
२. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे भारतीय भूसेना अधिनियम १९११ याऐवजी हे दाखल करण्यात आले.
३. १९३४ चा अधिनियम ३५ – कलम २ व अनुसूची यांद्वारे समाविष्ट करण्यात आले.
४. अनुकूलन आदेश १९५० द्वारे किंवा हा शब्द वगळण्यात आला.
५. आता नौसेना अधिनियम १९५७ (१९५७ चा ६२) पहा.
६. अनुकूलन आदेश १९५० द्वारे याद्वारे विशोधित केलेला तो अधिनियम हा मजकूर वगळण्यात आला.
७. १९३२ चा अधिनियम १४ – कलम १३० व अनुसूची यांद्वारे किंवा वायुसेना अधिनियम याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
८. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे भारतीय वायुसेना अधिनियम १९३२ याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply