भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण ६ :
राज्यविरोधी अपराधांविषयी :
कलम १२१ :
भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
(See section 147 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा युद्ध करण्याचा प्रयत्न करने किंवा युद्ध करण्यास अपप्रेरण देणे.
शिक्षा :मृत्यू किंवा आजन्म कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
———–
जो कोणी १.(भारत सरकार) विरुद्ध युद्ध करील, किंवा असे युद्ध करण्याचा प्रयत्न करील, किंवा असे युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल, त्याला मृत्यूची किंवा २.(आजन्म कारावासाची) शिक्षा होईल ३.(आणि तो द्रव्यसंडासही पात्र होईल).
४.(उदाहरण :
५.(***) (क) १.(भारत सरकार) विरोधी उठावात सामील होतो. या कलमात व्याख्या केलेला अपराध (क) ने केला आहे.
६.(***))
——–
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीन याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम २६ चा कलम ११७ आणि अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९२१ चा अधिनियम १६ चा कलम २ द्वारे आणि त्याला आपली सर्व संपत्ती गमवावी लागेल याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९२१ चा अधिनियम १६ चा कलम २ व अनुसूची २ याद्वारे उदाहरणे यांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. १९२१ चा अधिनियम १६ चा कलम २ व अनुसूची २ याद्वारे (क) हे अक्षर वगळण्यात आले.
६. अनुकूलन आदेश १९५० द्वारे उदाहरण (ख) वगळण्यात आले.