Ipc कलम १२०- अ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) याची व्याख्या :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण ५-अ :
१.(फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) :
कलम १२०- अ :
फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) याची व्याख्या :
(See section 61(1) of BNS 2023)
जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून –
१)एखादी अवैध कृती – किंवा
२)एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांमार्फत
करण्याचा किंवा करविण्याचा करार करतात तेव्हा त्या करारास फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) असे म्हटले जाते.
परंतु, अपराध करण्याचा करार वगळता जर इतर करार असेल तेव्हा त्या कराराच्या सभासदापैकी एकाने अगर अधिकांनी त्यानुसार अशा कराराव्यतिरिक्त आणखी एखादी कृती केल्याशिवाय फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) या सदरात मोडणार नाही.
स्पष्टीकरण :
ती अवैध कृती हे अशा कराराचे अंतिम उद्दिष्ट आहे की, त्या उद्दिष्टास ती नुसती आनुषंगिक आहे हे बिनमहत्वाचे आहे.)
———–
१. १९१३ चा अधिनियम ८ – कलम ३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply