Ipc कलम १०८-अ : भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण (चिथावणी देणे) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १०८- अ :
१.(भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण (चिथावणी देणे) :
(See section 47 of BNS 2023)
जी कोणतीही कृती २.(भारतात) केली गेली तर अपराध ठरेल ती कृती २.(भारताबाहेर) आणि त्याच्या पलीकडे करण्यास जी व्यक्ती २.(भारतामध्ये) असताना अपप्रेरणा (चिथावणी) देते ती व्यक्ती या संहितेच्या अर्थानुसार अपराध करते.
उदाहरण :
भारतात असताना (क) हा गोव्यामधील (ख) या विदेशी व्यक्तीला गोव्यामध्ये खून करण्यास चिथावणी देतो. (क) हा खुनाला अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी आहे.)
———
१. १८९८ चा अधिनियम ४ – कलम ३ द्वारे जादा दाखल केले.
२. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी दाखल करण्यात आला.

Leave a Reply