Ipc कलम ३५४-ड: १.(चोरुन पाठलाग करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३५४-ड:
१.(चोरुन पाठलाग करणे :
(See section 78 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरुन पाठलाग करणे.
शिक्षा :पहिल्या अपराध सिद्धीसाठी ३ वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : चोरुन पाठलाग करणे.
शिक्षा :दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधसिद्धीसाठी ५ वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
(१) जो कोणताही पुरुष –
(एक) एखाद्या स्त्रीचा चोरुन पाठलाग करील आणि अशा स्त्रीने परस्पर जवळीक साधावी म्हणून तिला उत्तेजन देण्यासाठी, त्या स्त्रीने इच्छा नसल्ंयाचे स्पष्टपणे दर्शवले असूनही वारंवार तिच्याजवळ जाईल किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करील; किंवा
(दोन) त्या स्त्रीच्या इंटरनेट, ई-मेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाच्या वापरावर बारीक लक्ष ठेवील, तो चोरुन पाठलाग करण्याचा अपराध करतो असे मानण्यात येईल.
परंतु असे की, जर त्याने पाठलाग केला होता
(एक) गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी किंवा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाठलाग केला होता आणि ज्याच्यावर पाठलाग केल्याचा आरोप असेल त्या माणसाकडे गुन्ह्याला प्रतिबंध करण्याची आणि गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी राज्याने सोपवली होती; किंवा
(दोन) ते, कोणत्याही कायद्यान्वये किंवा एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कायद्यान्वये लादलेल्या कोणत्याही शर्तीचे किंवा आवश्यक बाबीचे अनुपालन म्हणून करण्यात आले होते; किंवा
(तीन) विशिष्ट परिस्थितीत असे वर्तन वाजवी व न्याय्य होते
असे सिद्ध केले तर, अशी वर्तणूक ही चोरुन पाठलाग या सदरात जमा होणार नाही.
(२) जो कोणी चोरुन पाठलाग करण्याचा अपराध करील त्याला पहिल्यांदा दोषसिद्ध ठरल्यावर, तीन वर्षांपर्यंत असू शकेल अशी, कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तसेच, तो दंडासही पात्र ठरेल; आणि दुसऱ्यांदा आणि त्यानंतर सिद्धदोष ठरला तर त्याला पाच वर्षांपर्यंत असू शकेल अशी, कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तसेच तो दंडासही पात्र होईल.)
——–
१.सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम क्र २०१३ चा १३ द्वारे घातला.

Leave a Reply