Ipc कलम १७० : लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७० :
लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :
(See section 204 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाची बतावणी करुन तोतयेगिरी करणे.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———–
जो कोणी स्वत: लोकसेवक म्हणून कोणतेही विशिष्ट अधिकारपद धारण करत नाही, हे माहीत असताना असे अधिकारपद धारण करण्याचा बहाणा करील, अथवा असे अधिकारपद धारण करणाऱ्या अन्य कोणत्याही व्यक्तीची बतावणी करून तोतयेगिरी करील आणि अशा बनावट भूमिकेत असताना अशा पदाधिकाऱ्याच्या अमिषाने कोणतीही कृती करील किंवा तसा करण्याचा प्रयत्न करील तर त्यास, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply