भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३८ :
भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:
(See section 166 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला शिरजोरीने कृत्य करण्यास अपप्रेरणा देणे – परिणामी अपराध घडल्यास.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
———-
जो कोणी १.(भारत सरकारच्या) भूसेनेतील, २.(नौसेनेतील, किंवा वायुसेनेतील) कोणत्याही अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, २.(नौसैनिकाला, किंवा वायुसैनिकाला) जी कृती शिरजोरीची ठरेल हे स्वत:ला माहीत असून, अशी कृती करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, त्या अपप्रेरणेच्या (चिथावणीच्या) परिणामी अशी शिरजोरीची कृती करण्यात आली, तर सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
———-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा क्वीन याऐवजी दाखल करण्यात आले.
२. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.
कलम १३८-अ :
पूर्ववर्ती (वरील सर्व) कलमे भारतीय सागरी सेवेला लागु होणे:
विशोधन अधिनियम ३५ सन १९३४ याचे कलम २ आणि अनुसूचीद्वारे निरसित.