Hsa act 1956 कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १५ :
हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :
१) मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू स्त्रीची संपत्ती,-
(a)क) पहिल्यांदा, पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती यांच्याकडे ;
(b)ख) दुसऱ्यांदा, पतीच्या वारसदारांकडे ;
(c)ग) तिसऱ्यांदा, माता आणि पिता यांच्याकडे ;
(d)घ) चवथ्यांदा, पित्याच्या वारसदारांकडे ; आणि
(e)ङ) शेवटी, मातेच्या वारसदारांकडे.
कलम १६ मध्ये दिलेल्या नियमांनुसार प्रक्रांत होईल.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी,-
(a)क) हिंदू स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, मृताचा कोणताही पुत्र किंवा कन्या (कोणत्याही पूर्वमृत पुत्राची किंवा कन्येची अपत्ये धरुन) नसल्यास, पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्रमानुसार त्यात निर्दिष्ट केलेल्या वारसदारांकडे नव्हे, तर पित्याच्या वारसदारांकडे प्रक्रांत होईल ; आणि
(b)ख) हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासऱ्यांकडून वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, मृताचा कोणताही पुत्र किंवा कन्या (कोणत्याही पूर्वमृत पुत्राची किंवां कन्येची अपत्ये धरुन) नसल्यास, पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्रमानुसार त्यात निर्दिष्ट केलेल्या अन्य वारसदारांकडे नव्हे, तर पतीच्या वारसदारांकडे प्रकांत होईल.

Leave a Reply