Hma 1955 कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ५ :
हिंदू विवाहाच्या शर्ती :
पुढील शर्ती पूर्ण झाल्यास, कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल; त्या शर्ती अशा –
एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा;
१.(दोन) विवाहाच्या वेळी कोणताही पक्ष, –
(a)क) मनोविकलतेमुळे विवाहास विधिग्राह्य संमती देण्यास असमर्थ नसावा; किंवा
(b)ख) विधिग्राह्य संमती देण्यास समर्थ असला तरी, विवाह करण्यास आणि संततीला जन्म देण्यास अपात्र ठरेल अशा प्रकारचा वा अशा प्रमाणात त्याच्यात मानसिक बिघाड झालेला नसावा; किंवा
(c)ग) त्याला वारंवार भ्रमिष्टपणाचे वा अपस्माराचे झटके नसावेत.)
तीन) विवाहाच्या वेळी वराच्या वयाला २.(एकवीस वर्षे) व वधूच्या वयाला २.(अठरा वर्षे) पूर्ण झालेली असावीत.
चार) पक्ष निषिद्ध नातेसंबंधाच्या श्रेणींच्या अंतर्गत नसावेत – मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकाचे नियंत्रण करणाऱ्या रुढीने किंवा परिपाठाने उभयतांमधील विवाहास मुभा दिलेली असेल तर तो अपवाद समजावा;
पाच) पक्ष एकमेकांचे सपिंड नसावेत – मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकाचे नियंत्रण करणाऱ्या रुढीने किंवा परिपाठाने उभयतांमधील विवाहास मूभा दिलेली असेल तर तो अपवाद समजावा;
३.(***)
——–
१. १९७६ चा अधिनियम ६८, कलम २ द्वारे खंड (दोन) ऐवजी घातले.
२. १९७८ चा अधिनियम २, कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९७८ चा अधिनियम २, कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.

Leave a Reply