अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९९ :
दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ हे या अधिनियमानुुसार तयार केलेले विनियम असल्याचे मानले जाईल :
१) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेला व तारखेपासून, दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ जे अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (१९५५ चा १०) नुसार काढले होते, ते दुध व दुधाचे पदार्थ विनियम १९९२ जे या अधिनियमानुसार अन्न (खाद्य) प्राधिकरणाने जारी केले आहेत असे मानले जाईल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरण, केन्द्र सरकारच्या पूर्वमंजुरीने आणि अधिसूचनेद्वारे पूर्वप्रकाशित करुन या अधिनियमांच्या उद्देशपूर्तीकरता पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विनियमात सुधारणा करु शकेल.