Fssai कलम ९८ : अन्न (खाद्य) मानकांकरिता अस्थायी तरतूद :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९८ :
अन्न (खाद्य) मानकांकरिता अस्थायी तरतूद :
दुसऱ्या अनुसूचीतील निर्दिष्ट केलेले अधिनियम आणि आदेश यांचे निरसन झाले असले तरी, त्या अधिनियम व त्याखालील नियम व विनियम याखालील मानके, सुरक्षा अपेक्षा आणि इतर तरतुदी व त्या अनुसूचीच्या यादीतील आदेश, हा अधिनियम किंवा त्याखालील नियम व विनियम याद्वारे नवीन मानके विनिर्दिष्ट होईपर्यंत ते प्रभावी असतील :
परंतु असे की, निरसन झालेला अधिनियम व आदेशानुसार जी गोष्ट केली आहे किंवा कोणतीही कार्यवाही केली आहे ती या अधिनियमांच्या मिळत्याजुळत्या तरतुदीनुसार केली आहहे असे मानले जाईल व या अधिनियमानुसार केलेली कोणतीही कार्यवाही किंवा केलेल्या गोष्टीने त्यांचे दमन करण्यात येईपर्यंत त्या अमलात असतील.

Leave a Reply