Fssai कलम ९७ : निरसन व व्यावृत्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९७ :
निरसन व व्यावृत्ती :
१) केन्द्र सरकार याबाबतीत नेमून देईल त्या तारखेपासून दुरस्या अनुसूचित नमूद केलेल्या अधिनियमिती व आदेश रद्दबातल होतील :
परंतु अशा रद्दबातलतेचा निम्नलिखित बाबींवर परिणाम होणार नाही –
एक) निरसनातील अधिनियम व आदेशांचे पूर्वप्रवर्तन किंवा योग्य रितीने केलेली किंवा सोसलेली त्याखालील बाब;
दोन) निरसनाखालील अधिनियम व आदेशांद्वारे मिळालेले किंवा पत्करलेले कोणतेही हक्क, विशेषाधिकार, कर्तव्यबंधने किंवा दायित्व; किंवा
तीन) निरसनाखालील अधिनियम व आदेशांच्या बाबतीत घडलेल्या अपराधाबाबत लादण्यात आलेला दंड, जप्ती किंवा शिक्षा; किंवा
चार) असा कोणताही दंड, जप्ती किंवा शिक्षेबाबतचा कोणताही तपास किंवा उपचार;
आणि हा अधिनियम संमत करण्यात आला नसल्याप्रमाणेच असा तपास, कायदेशीर कार्यवाही किंवा उपाययोजना सुरु करण्यात, चालू ठेवण्यात किंवा अंमलात आणण्यात येईल आणि अशी कोणतीही शास्ती, जप्ती किंवा शिक्षा लादण्यात येईल.
२) जर या अधिनियमासमान इतर कोणताही कायदा कोणत्याही राज्यात त्यावेळी कार्यान्वित असेल , तर या अधिनियमाच्या प्रारंभानंतर त्याचे निरसन होईल, व अशा राज्याच्या कायद्याच्या अशा तरतुदींचे निरसन झाले असेल तर अशा बाबतीत सर्वसाधाण परिभाषा अधिनियम १८९७ (१८९७ चा १०) चे कलम ६ च्या तरतुदी लागू होईल.
३) असा अधिनियम व आदेशांचे निरसन झाले असले तरी असा कोणताही अधिनियम किंवा आदेशाद्वारे देण्यात आलेल्या अनुज्ञप्ती, ज्या या अधिनियमाच्या प्रारंभाचे वेळी अमलात असतील त्या त्यांच्या अवधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व उद्देशांकरिता जणू त्या या अधिनियमाखाली किंवा त्याखालील नियम किंवा विनियमानुसार देण्यात आल्या असल्याप्रमाणे अमलात राहतील.
४) त्या त्याकाळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यांत काहीही असले तरी, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेनंतर तीन वर्षांनंतर निरसित अधिनियम किंवा आदेशाखालील घडलेल्या अपराधाची, कोणतेही न्यायालय दखल घेणार नाही.

Leave a Reply