अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९६ :
शास्तीची (दंडाची) वसुली :
या अधिनियमानुसार लादलेला दंड, भरला नसेल तर तो जमीन महसूलाच्या थकबाकीचे स्वरुपात वसूल करु शकतील आणि कसूर करणाऱ्यांची अनुज्ञप्ती (परवाना) दंडाची रक्कम भरेपर्यंत निलंबित ठेवता येईल.