Fssai कलम ९३ : संसदेपुढे नियम किंवा विनियम ठेवणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९३ :
संसदेपुढे नियम किंवा विनियम ठेवणे :
या अधिनियमान्वये तयार करण्यात आलेला प्रत्येक नियम व विनियम तयार केल्यानंतर यथाशीघ्र, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, जेव्हा अधिवेशन चालू असेल व त्याचा कालावधी एकूण तीस दिवसांचा असेल जो, एका अधिवेशनाचा किंवा दोन किंवा जास्त लागोपाठ असलेल्या अधिवेशनाचा असेल, आणि अधिवेशन संपण्याअगोदर किंवा पुढील अधिवेशनात किंवा उपरोक्त लागोपाठच्या अधिवेशनांत दोन्ही सदनांत या नियमांत किंवा विनियमांत कोणताही बदल हवा अशी सहमती झाली तर नियम किंवा कार्यप्रणाली त्यानंतर बदललेल्या स्वरुपांत कार्यान्वित होईल किंवा यथास्थिती कार्यान्वित होणार नाही, तथापि, जे बदल कार्यान्वित होतील किंवा होणार नाहीत त्यांचा या नियम किंवा विनियमांद्वारे पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टींच्या विधिग्राह्यतेबाबत बाधा येणार नाही.

Leave a Reply