Fssai कलम ९२ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची विनियम करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९२ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाची विनियम करण्याची शक्ती :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरण, केन्द्र सरकारच्या पूर्व मंजुरीने अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी, अधिसूचनेद्वारे प्रकाशित करुन अधिनियम व त्याखालील नियमांशी सुसंगत असे विनियम तयार करील.
२) विशिष्टत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या व्यापकतेवर बाधा येऊ न देता निम्नलिखित पैकी सर्व किंवा कोणत्याही बाबतीत विनियम करता येतील, अर्थात :-
(a) क) कलम ९ च्या पोटकलम (३) अन्वये अन्न (खाद्य) प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन वे सेवेच्या इतर शर्ती;
(b) ख) कलम ११ च्या पोटकलम (५) अन्वये कामकाज चालविण्याच्या कार्यपद्धतीचे नियम;
(c) ग) कलम १२ च्या पोटकलम (२) अन्वये केन्द्रीय सल्लागार समितीची इतर कार्ये;
(d) घ) कलम १५ च्या पोटकलम (४) अन्वये वैज्ञानिक समिती आणि पॅनची प्रक्रिया;
(e) ङ) कलम १६ च्या पोटकलम (२) अन्वये मानवी वापरासाठी असलेल्या अन्न (खाद्य) पदार्थाच्या संबंधित मानके आणि मार्गदर्शक तत्वे अधिसूचित करणे;
(f) च) कलम १७ च्या पोटकलम (१) अन्वये अन्न (खाद्य) प्राधिकरणाने त्याच्या बैठकीचे कामकाज चालवण्यिासाठी अवलंबिण्याची कार्यपद्धती;
(g) छ) कलम १८ च्या पोटकलम (२) च्या खंड (d)(घ) अन्वये अन्न (खाद्य) सुरक्षा व सार्वजनिक आराग्याच्या दृष्टीने तातडीने नियम करणे किंवा ते सुधारणे;
(h) ज) कलम १९ अन्वये अन्न (खाद्य) समावेशाच्या मर्यादा;
(i) झ) कलम २० अन्वये संदूषके, विषारी पदार्थ आणि भारी धातू इत्यादी विषयींच्या परिमाणांच्या मर्यादा;
(j) ञ) कलम २१ अन्वये किटकनाशके, पशुचिकित्स औषधी अवशेष इत्यादींची मानवणाऱ्या प्रमाणाची मर्यादा;
(k) ट) कलम २३ अन्वये अन्नाचे (खाद्याचे) चिन्हांकन आणि लेबल लावण्याची पद्धत;
(l) ठ) कलम २६ च्या पोटकलम (४) अन्वये ज्यामध्ये हमी देण्यात येईल तो नमुना;
(m) ड) कलम २८ च्या पोटकलम (४) अन्वये अन्न (खाद्य) परत मागविण्याच्या कार्यपद्धतीविषयी शर्ती व मार्गदर्शक तत्वे;
(n) ढ) कलम २९ च्या पोटकलम (५) अन्वये अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारीच्या कार्याविषयीचे विनियम;
(o) ण) नोंदणी करणारे अधिकारी आणि नोंदणीची पद्धत, अनज्ञुप्ती (परवाना) मिळविण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत, त्यासाठी देय शुल्क (फी) आणि कलम ३१ अन्वये अशी अनुज्ञप्ती (परवाना) ज्या परिस्थितीत रद्द किंवा जप्त केला जाऊ शकतो, अधिसूचित करणे;
(p) त) कलम ३६ च्या पोटकलम (१) अन्वये अन्न (खाद्य) सुरक्षा निर्देशित अधिकारी ज्याचे प्रभारी असतील अशी क्षेत्रे;
(q) थ) कलम ४० च्या पोटकलम (१) अन्वये अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण करण्याची कार्यपद्धती, शुल्कासंबंधीचा तपशील इत्यादी;
(r) द) कलम ४३ च्या पोटकलम (३) अन्वये अन्न (खाद्य) प्रयोगशाळांची कार्ये आणि त्यांनी अनुसरावयाची प्रक्रिया;
(s) ध) कलम ४७ च्या पोटकलम (६) अन्वये अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती;
(t) न) कलम ८१ च्या पोटकलम (२) अन्वये अन्न (खाद्य) प्राधिकरणाने त्यांचे अर्थसंकल्प तयार करताना पाळले जाणारे आर्थिक विनियम;
(u) प) कोडेक्सच्या बैठकीत भाग घेण्याकरिता मार्गदर्शक तत्वे किंवा निदेश जारी करणे आणि कोडेक्स विषयांचे प्रतिसाद (उत्तर) तयार करणे; आणि
(v) फ) अशा इतर कोणत्याही बाबी ज्या विनियमांद्वारे विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे किंवा असू शकते किंवा ज्याच्या संदर्भात विनियमांद्वारे तरतुदी करावयाच्या आहेत.

Leave a Reply