Fssai कलम ९१ : केन्द्र सरकारची नियम करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९१ :
केन्द्र सरकारची नियम करण्याची शक्ती :
१) केन्द्र सरकार या अधिनियमाच्या तरतुदींना कार्यान्वित करण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम बनवू शकेल.
२) विशिष्टत: आणि पूर्वगामी सर्वसाधारण शक्तीस बाधा न येऊ देता, असे नियम निम्नलिखित किंवा कोणत्याही बाबींसाठी करु शकेल, –
(a) क) कलम ७ च्या पोटकलम (२) अन्वये अध्यक्ष आणि पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचे वेतन, पदाची मुदत आणि सेवेच्या अटी आणि त्याच्या पोटकलम (३) अन्वये पदाची आणि गोपयितेची शपथ घेण्याची पद्धत;
(b) ख) कलम ३७ च्या पोटकलम (१) अंतर्गत अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याची पात्रता;
(c) ग) कलम ३८ च्या पोटकलम (८) अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचे उतारे घेण्याची पद्धत;
(d) घ) कलम ४२ च्या पोटकलम (४) अन्वये योग्य त्या न्यायालयाकडे सादर करावयाची प्रकरणे निर्धारित करणे आणि अशा निधारणासाठी वेळ-मर्यादा;
(e) ङ) कलम ४५ अन्वये अन्न (खाद्य) विश्लेषकांची पात्रता;
(f) च) कलम ४७ च्या पोटकलम (१) अंतर्गत नमुना विश्लेषणास पाठविण्याची पद्धती आणि त्यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धतीचे सविस्तर विवरण (तपशील);
(g) छ) कलम ६८ च्या पोटकलम (१) अंतर्गत खटल्याच्या न्यायनिर्णयासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती;
(h) ज) कलम ७० च्या पोटकलम (४) अंतर्गत पीठासीन अधिकाऱ्याची पात्रता, सेवेचा कालावधी, राजीनामा व बडतर्फी (काढून टाकणे) आणि पोटकलम (५) अंतर्गत अपील करण्याची प्रक्रिया आणि न्यायाधिकरणाचे अधिकार (शक्ती);
(i) झ) कलम ७१ च्या पोटकलम (२) च्या खंड (छ) अंतर्गत न्यायाधिकरणाच्या कार्यपद्धती आणि अधिकारांशी संबंधित इतर कोणत्याही बाबी;
(j) ञ) कलम ७६ च्या पोटकलम (१) अंतर्गत उच्च न्यायालयापुढे अपील करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क (फी);
(k) ट) कलम ८१ च्या पोटकलम (१) अंतर्गत अंर्थसंकल्पाचे स्वरुप आणि वेळ;
(l) ठ) कलम ८३ च्या पोटकलम (१) अंतर्गत हिशोबाचे लेखे व निवेदन;
(m) ड) कलम ८४ च्या पोटकमल (१) अंतर्गत अन्न (खाद्य) प्राधिकरणाद्वारे वार्षिक अहवाल तयार करण्याचे स्वरुप आणि वेळ; आणि
(n) ढ) इतर कोणतीही बाब जी आवश्यक आहे, किंवा असू शकते, विहित केलेली आहे किंवा ज्याच्या संदर्भात केंद्र सरकारने नियमांद्वारे तरतूद करणे आवश्यक आहे.

Leave a Reply