Fssai कलम ९० : अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी संबंधित विविध कायदे किंवा आदेश यांचे नियमन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या विविधि एजन्सीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांची बदली अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे करणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ९० :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी संबंधित विविध कायदे किंवा आदेश यांचे नियमन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या विविधि एजन्सीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांची बदली अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे करणे :
अन्न (खाद्य) प्राधिकारणाची स्थापना झाल्याच्या तारखेस व त्या तारखेपासून, अन्न (खाद्य) विषयक कायद्यांचे प्रशासन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या एजन्सीमध्ये त्या तारखेच्या लगत पूर्वी पदे धारण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच कालावधीसाठी आणि त्याच सेवाशर्ती व अटींवर अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे सेवेत ठेवण्यात येइल व अन्न (खाद्य) प्राधिकरण स्थापन झाले नसेल तर जे मानधन, रजा, भविष्य निर्वाहनिधी, सेवानिवृत्ती व इतर सेवांत सुविधा मिळाल्या असत्या त्याच सुविधा त्याला अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा कर्मचारी म्हणून मिळतील आणि त्याने अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा कर्मचारी न होण्याचे ठरविले नाही तर तो तर तो प्राधिकरणाचा कर्मचारी म्हणून कार्य करील राहील किंवा त्या पदावर अशा तारखेपासून सहा महिन्यापर्यंत राहील.

Leave a Reply