Fssai कलम ८८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८८ :
सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :
केन्द्र सरकार, राज्य सरकार, अन्न (खाद्य) प्राधिकरण व या अधिनियमाद्वारे बनविलेली इतर मंडळे किंवा केन्द्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही सदस्य, अधिकारी किंवा प्राधिकरणाचे इतर कर्मचारी व मंडळे किंवा या अधिनियमाखाली कार्यरत असलेला कोणताही अधिकारी या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियम व विनियमांद्वारे केलेली कार्यवाही जी सद्भावपूर्वक केली जाते किंवा तसे करण्याचा उद्देश असेल तर त्याचे विरुद्ध कोणताही दावा, फौजदारी खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.

Leave a Reply