Fssai कलम ८७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी आणि अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त लोकसेवक असतील :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८७ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी आणि अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त लोकसेवक असतील :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी व अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त व त्यांचे अधिकारी या अधिनियमाच्या तरतुदींनुसार कार्य करीत असतील किंवा कार्य करीत असल्याचे अभिप्रेत असेल, तेव्हा ते भारतीय दंड संहिता १८६० याच्या कलम २१ (१ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २ पोटकलम २८) अन्वये लोकसेवक म्हणून समजले जाईल.

Leave a Reply