Fssai कलम ८५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणास निदेश जारी करणे आणि अहवाल व विवरण मागविण्याचे केन्द्र सरकारचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण १२ :
संकीर्ण :
कलम ८५ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणास निदेश जारी करणे आणि अहवाल व विवरण मागविण्याचे केन्द्र सरकारचे अधिकार (शक्ती) :
१) या अधिनियमातील पूर्वगामी तरतुदींस बाधा न आणता, अन्न (खाद्य) प्राधिकरण त्याच्या या अधिनियमाखाली असलेल्या अधिकारांचा वापर करताना व कार्ये पार पाडताना केन्द्र सरकारने वेळोवेळी लिखित स्वरुपात दिलेल्या, ज्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींव्यतिरिक्त इतर धोरणांबाबतीतील सूचना बंधनकारक असतील :
परंतु असे की, या पोटकलमाखाली कोणत्याही सूचना देण्यापूर्वी अन्न (खाद्य) प्राधिकरणास, व्यवहार्य असेल तिथपर्यंत त्याचा विचार मांडण्याची संधी दिली जाईल.
२) जर केन्द्र सरकार आणि अन्न (खाद्य) प्राधिकरण यांच्यात एखादा प्रश्न हा धोरणाशिवाय आहे किंवा नाही याबाबतीत वाद निर्माण झाल्यास, त्यावर केन्द्र सरकारचा निर्णय अंतिम असेल.
३) अन्न (खाद्य) प्राधिकरण केन्द्र सरकारला वेळोवेळी आपल्या क्रियाकलापांच्या (कार्यक्रमाच्या) संबंधात हवी असलेली विवरणे व इतर माहिती देईल.

Leave a Reply