अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ८२ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाची वित्तव्यवस्था :
१) केन्द्र सरकार, योग्य विनियोगानंतर (विनियोजनानंतर) अन्न (खाद्य) प्राधिकरणाला अनुदानाच्या स्वरुपात केन्द्र सरकारला योग्य वाटेल अशी रक्कम देईल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरण, केंद्रीय सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार, परवानाधारक (अनुज्ञप्तीधारक) अन्न (खाद्य) व्यावसायिक, मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा अन्न सुरक्षा लेखा परीक्षकांकडून श्रेणीबद्ध शुल्क निर्दिष्ट करेल, जे अन्न सुरक्षा आयुक्तांकडून आकारले जाईल.