Fssai कलम ८१ : अन्न (खाद्य) प्राधिकारणाचे अर्थसंकल्प (बजेट) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ११ :
वित्त, लेखा (हिशेब), लेखापरिक्षण व अहवाल :
कलम ८१ :
अन्न (खाद्य) प्राधिकारणाचे अर्थसंकल्प (बजेट) :
१) प्रत्येक वित्तीय वर्षात अन्न (खाद्य) प्राधिकरण केन्द्र सरकारने विहित केल्याप्रमाणे अशा तक्त्यात व अशावेळी, आपला पुढील वित्तीय वर्षासाठीचा अर्थसंकल्प (बजेट) ज्या अन्न(खाद्य) प्राधिकरणाची साधारण अंदाजे जमा आणि खर्चाचा गोषवारा असेल व तो अर्थसंकल्प अन्न (खाद्य) प्राधिकरण केन्द्र सरकारला पाठविल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरण केन्द्र सरकारच्या पूर्वमंजुरीने, वित्तीय विनियिमाचा अवलंब करील ज्यात विशेषकरुन अर्थसंकल्पाचे रेखाटण व कार्यान्वित करणे यांच्या कार्यपद्धतीचा तपशील असेल.

Leave a Reply