अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५९ :
असुरक्षित अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती :
कोणतीही व्यक्ती जी स्वत: किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, असुरक्षित अन्नाचे (खाद्याचे) मानवी सेवनासाठी विक्रीसाठी उत्पादन किंवा साठवण करते किंवा विक्री किंवा वितरण करते किंवा आयात करील, –
एक) जेथे अशा कसुरी किंवा उल्लंघनामुळे हानी पोहचत नाही तेथे १.(तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि तीन लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या) शिक्षा होऊ शकेल.
दोन) जेथे अशा कसुरी किंवा उल्लंघनामुळे गंभीर दुखापत झाली नसेल तेथे एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि तीन लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षा होऊ शकेल.
तीन) जेथे अशा कसुरी किंवा उल्लंघनामुळे गंभीर दुखापत झाली असेल तेथे सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि पाच लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र ठरेल.
चार) जेथे अशा कसुरी किंवा उल्लंघनामुळे मृत्यु घडला असेल तेथे कमीत कमी सात वर्ष जो आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि दहा लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षा होऊ शकेल.
——-
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
