Fssai कलम ५७ : भेसळ होऊ शकेल (अपद्रव्य) असा घटक बाळगल्याच्या बाबतीत शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५७ :
भेसळ होऊ शकेल (अपद्रव्य) असा घटक बाळगल्याच्या बाबतीत शास्ती :
१) या प्रकरणाच्या तरतुदींना अधीन राहून, जर एखादी व्यक्ती, जो स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, भेसळ होऊ शकेल अशा घटकाची विक्रीसाठी आयात करील किंवा उत्पादन करील किंवा साठवण करील किंवा विक्री किवा वितरण करील तर तो,-
एक) भेसळ होऊ शकेल असा घटक आरोग्यास हानिकारक नसेल तेव्हा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल, आणि
दोन) भेसळ होऊ शकेल असा घटक आरोग्यास हानिकारक असेल तेव्हा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
२) पोटकलम (१) द्वारे केलेल्या कार्यवाहीत, भेसळ होऊ शकेल असा घटक कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसाठी घेतला असल्याचा आरोपीचा बचाव ग्राह्य धरला जाणार नाही.

Leave a Reply