Fssai कलम ५२ : मिथ्या छाप वाल्या अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५२ :
मिथ्या छाप वाल्या अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ती :
१) कोणतीही व्यक्ती जी स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे मानवी सेवनाकरिता मिथ्या छाप असलेले अन्न (खाद्य) विक्रीसाठी उत्पादन किंवा साठवण करतो किंवा विकी किंवा वितरण किंवा आयात करील, ती व्यक्ती तीन लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
२) न्यायनिर्णय करणारे अधिकारी या कलमाखाली शिक्षेस पात्र अपराधासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीस, चुक सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत किंवा असे अन्न (खाद्य) पदार्थ नष्ट करण्याबाबत निर्देश देतील.

Leave a Reply