अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४९ :
शास्ती संबंधित सर्वसाधारण तरतुदी :
जेव्हा या प्रकरणा अन्वये शास्तिची मात्रेचा न्यायानिर्णय करताना, न्यायनिर्णय करणारे अधिकारी किंवा यथास्थिती, न्यायाधिकरण निम्नलिखित बाबी लक्षात घेतील,-
(a) क) उल्लंघनाच्या परिणामस्वरुप होणारा लाभ किंवा अनुचित लाभ याद्वारे मिळालेल्या रक्कमेचे मूल्यांकन करणे शक्य असेल;
(b) ख) उल्लंघनाच्या परिणामस्वरुप कोणत्याही व्यक्तीला होणारे नुकसान किंवा अशी हानी यांची शक्यता आहे, त्याची रक्कम;
(c) ग) उल्लंघनाच्या पुनरावृत्तीचे स्वरुप;
(d) घ) मग उल्लंघन त्याला माहित नसताना केले गेले आहे; आणि
(e) ङ) इतर कोणतीही सुसंगत परिस्थिती.