अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ९ :
अपराध आणि शास्ती :
कलम ४८ :
अपराधांसंबंधित सर्वसाधारण तरतुदी :
१) कोणतीही व्यक्ती कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाला मानव उपभोगासाठी विकले जाण्याची किंवा विक्री करण्यासाठी प्रदशित केले जाण्याची किंवा वितरित केली जाण्याची शक्यता असेल, या जानीवेसहित, निम्नलिखित पैकी कोणत्याही एक किंवा अधिक क्रियांद्वारे आरोग्यास हानीकारक बनवते, अर्थात :-
(a) क) अन्नामध्ये (खाद्यामध्ये) कोणतीही वस्तु किंवा पदार्थ मिसळून;
(b) ख) अन्न (खाद्य) तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही वस्तु किंवा पदार्थाचा वापर करुन;
(c) ग) अन्नातील (खाद्यातील) कोणताही घटक काढून घेवून; किंवा
(d) घ) अन्नाशी (खाद्याशी) कोणतीही अन्य प्रकिया किंवा औपचारिकता करुन.
२) कोणतेही अन्न (खाद्य) असुरक्षित किंवा आरोग्यास हानीकारक आहे किंवा नाही हे निश्चित करताना, निम्नलिखित बाबी विचारात घेतल्या जातील,-
(a) क) एक) ग्राहकाच्या अन्नाच्या (खाद्याच्या) वापराबाबतची सर्वसाधारण स्थिती आणि त्याचे उत्पादन, प्रकिया व वितरणातील प्रत्येक स्तरावरचे हाताळणे;
दोन) ग्राहकाला दिलेली माहिती, तसेच लेबलवरची माहिती किंवा विशेष अन्नाच्या (खाद्याच्या) आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची ग्राहकाला सर्वसाधारणपणे उपलब्ध माहिती किंवा अन्नाचे (खाद्याचे) जे वर्ग संभवनीयरीत्या लगेच किंवा अल्पमुदतीत किंवा दीर्घमुदतीत त्या अन्न (खाद्य) सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम दर्शवितात किंवा पुढील पिढीवरही जे होऊ शकतात याची माहिती, यांचा समावेश आहे;
तीन) संभाव्य संचयी विषाणू प्रभाव;
चार) जेथे अन्न (खाद्य) पदार्थ ज्या विनिर्दिष्ट ग्राहक वर्गासाठी उद्देशित असेल अशा बाबतीत त्या विनिर्दिष्ट ग्राहक वर्गावर झालेले अन्नाचे (खाद्याचे) संवेदनशील परिणाम; आणि
पाच) त्याचे सर्वसाधारण प्रमाणात सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास भरघोस प्रमाणात तशाच प्रकारच्या अन्नाचा (खाद्याचा) संभाव्य संकलित परिणाम;
(b) ख) कोणतेही प्राथमिक अन्न (खाद्य) पदार्थ, ते नैसर्गितरित्या व मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या कारणाने घडले असेल तर त्याचा दर्जा किंवा शुद्धता विनिर्दिष्ट दर्जापेक्षा कमी असेल किंवा त्यातील घटकांचे प्रमाण परिवर्तनशीलता मर्यादेपेक्षा अधिक आहे या कारणावरुन ते अन्न (खाद्य) असुरक्षित किंवा दुय्यम दर्जाचे किंवा बाह्य पदार्थाचा अंतर्भाव असलेले अन्न (खाद्य) मानले जाऊ शकणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी दुखापत (अपाय) या व्याखेत कोणतीही हानी पोहोचवणे, जी कायम किंवा तात्पुरती असेल आणि आयोग्यास अपायकारक या व्याख्येचा त्याप्रमाणे अर्थ लावला जाईल.