Fssai कलम ३१ : अन्न (खाद्य) व्यवसायाचा परवाना (अनुज्ञप्ती) व नोंदणी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३१ :
अन्न (खाद्य) व्यवसायाचा परवाना (अनुज्ञप्ती) व नोंदणी :
१) कोणतीही व्यक्ती कोणताही अन्न (खाद्य) व्यवसाय परवान्याशिवाय (अनुज्ञप्तीशिवाय) सुरु करणार नाही किंवा चालू ठेवणार नाही.
२) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट, किरकोळ उत्पादक जो स्वत: अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन व विक्री करतो किंवा किरकोळ छोटा विक्रेता, फेरीवाले, फिरते विक्रेते, तात्पुरत्या स्टॉल धारक किंवा लघू किंवा घरगुती किंवा अशा स्वरुपाचे अन्न (खाद्य) उद्योग किंवा छोट्या अन्न (खाद्य) व्यावसायिकांना, लागू होणार नाही; परंतु ते, मानवी उपभोगासाठी आणि पौष्टिक अन्नाच्या (खाद्याच्या) उपलब्धतेवर प्रतिकूल प्रभाव न पाडता किंवा ग्राहकाच्या हित जपण्यासाठी, अशा प्राधिकरणाकडे आणि अशा पद्धतीने विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे स्वत:ची नोंदणी करतील.
३) अन्न (खाद्य) व्यवसाय सुरु करु इच्छिणारा किंवा चालवू इच्छिणारा कोणताही व्यक्ती, विनियमांद्वारे विहित केलेल्या तपशिल आणि फी देऊन परवान्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे अनुज्ञप्तिसाठी (परवान्यासाठी) अर्ज करील.
४) पोटकलम (३) अंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यावर नियुक्त अधिकारी, अनुज्ञप्ति (परवाना) मंजूर करील किंवा अर्जदारास योग्य ती सुनावणीची संधी देऊन, योग्य त्या कारणांची लेखी नोंद करुन, लोक स्वास्थ्याच्या हितासाठी योग्य वाटल्यास अर्ज फेटाळेल व अर्जदारास आदेशाची प्रत उपलब्ध करुन देईल :
परंतु असे की, अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत अनुज्ञप्ती मंजूर केली नाही किंवा अर्ज फटाळला गेला नाही, ती दोन महिन्यांच्या अवधीनंतर अर्जदाराला त्याचा अन्न (खाद्य) व्यवसाय सुरु करता येईल आणि अशा परिस्थितीत नियुक्त अधिकारी अनुज्ञप्ती (परवाना) नाकारु शकत नाही परंतु आवश्यक वाटल्यास, तो कलम ३२ नुसार सुधारणेची नोटीस जारी करु शकेल आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियेचे पालन करील.
५) प्रत्येक अनुज्ञप्ति (परवाना), विनियमांद्वोर विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे स्वरुपात आणि अटींच्या अधीन असेल.
६) एक किंवा अधिक अन्न (खाद्य) पदार्थांसाठी आणि एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या आस्थापना किंवा परिसरांसाठी, नियुक्त अधिकाऱ्या द्वारा एकच अनुज्ञप्ती (परवाना) जारी केला जाऊ शकेल.
७) एकापेक्षा अधिक क्षेत्रांतील वेगवेगळ्या जागांमध्ये अन्न (खाद्य) पदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री किंवा विक्रीसाठी प्रदर्शित करण्याची जागा, एकाच क्षेत्रात मोडत नसेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्ज केले जातील आणि प्रत्येक क्षेत्रास वेगळी अनुज्ञप्ती (परवाना) दिली जाईल.
८) अनुज्ञप्ती (परवाना) फेटाळली गेल्यास त्या आदेशाविरुद्धचे अपील अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताकडे करता येईल.
९) अनुज्ञप्ती (परवाना) आधी निलंबित किंवा रद्द केल्याशिवाय, विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीसाठी वैध राहील :
परंतु असे की, अनुज्ञप्तीच्या वैधतेची मुदत संपण्याच्या कालावधी आगोदर अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला असेल तर ती अनुज्ञप्ती नूतनीकरणाच्या अर्जावरील आदेश होईपर्यंत अंमलात राहील.
१०) अनुज्ञप्ती (परवाना) मृत व्यक्तीच्या वैयक्ति प्रतिनिधीच्या किंवा त्याच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या फायद्यासाठी निम्नलिखित कालावधीची समाप्ती हाईपर्यंत चालू राहील, अर्थात :-
(a) क) त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर तीन महिन्यांचा कालावधी;
(b) ख) असा अधिक अवधी ज्याला नियुक्त अधिकारी अनुमती देईल.

Leave a Reply