अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २४ :
जाहिरातीवरील निर्बंध आणि अनुचित व्यापार पद्धतींचे प्रतिबंधन :
१) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाची दिशाभूल करणारी किंवा फसवी किंवा या अधिनियमाच्या किंवा याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारी जाहीरात केली जाणार नाही.
२) कोणतीही व्यक्ती स्वत: अन्न (खाद्य) पदार्थाची विक्री, पुरवठा, वापर आणि वापारस प्रोस्ताहन देण्याच्या प्रयोजनासाठी अनुचित व्यापर पद्धतीत गुंतून राहू शकत नाही किंवा कोणत्याही अनुचित व्यापार प्रथा किंवा फसव्या पद्धतीचा अवलंब करु शकत नाही, ज्यामध्ये कोणतेही निवेदन करणे, मग ते तोंडी किंवा लेखी किंवा कोणतेही दृश्यमान वर्णन केलेले आहे अशा स्वरुपाचे असेल, जे –
(a) क) अन्न (खाद्य) हे कोणत्याही विशिष्ट मानकाचे, दर्जाचे किंवा परिमाणाचे किंवा रचनेचे खोटे दर्शविते;
(b) ख) कोणत्याही अन्नाची (खाद्याची) आवश्यकता किंवा त्याचे उपयुक्ततेसंबंधी खोटी किंवा दिशाभूल करणारी विधाने करणे;
(c) ग) अन्नाच्या (खाद्याच्या) प्रभावी असण्याबाबतची जनतेला (लोकांस) हमी देणे जी योग्य व वैज्ञानिक समर्थनावर आधारित नसेल :
परंतु असे की, जेथे योग्य व वैज्ञानिक समर्थनावर हमी दिली आहे असा बचाव घेतला असेल तर अशा बचावासंबंधीचे पुरावे आणण्याची जबाबदारी बचाव घेणाऱ्या व्यक्तीवर असेल.
