Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम १२ : केन्द्रीय सल्लागार समितीची कार्ये :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १२ :
केन्द्रीय सल्लागार समितीची कार्ये :
१) केंद्रीय सल्लागार समिती, अन्न (खाद्य) प्राधिकरण आणि अन्न (खाद्य) क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंमलबजावणी संस्था आणि संघटना यांच्यात घनिष्ठ सहकार्य सुनिश्चित करेल.
२) केन्द्रीय सल्लागार समिती अन्न (खाद्य) प्राधिकरणास निम्नलिखित बाबतीत सल्ला देईल, अर्थात :-
(a) क) या कलमा अन्वये त्यांचे कर्तव्य पालन व विशेषत: अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या कार्याच्या तपशीलासाठी किंवा कार्यक्रमासाठी कोणताही प्रस्ताव तयार करणे;
(b) ख) कार्याची प्राथमिकता;
(c) ग) संभाव्य धोके (जोखिम) ओळखणे;
(d) घ) ज्ञान गोळा (एकत्रित) करणे; आणि
(e) ङ) अशी अन्य कार्ये, जी विनियमांद्वारे निर्दिष्ट केली जातील.
३) केन्द्रीय सल्लागार समिती, त्याच्या अध्यक्षांच्या आमंत्रणावरुन किंवा कमीत कमी एक तृतीयांश सभासदांच्या अनुरोधाने नियमितपणे वर्षातून कमीत कमी तीन बैठकी घेतील.

Exit mobile version