अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ११ :
केन्द्रीय सल्लागार समिती :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरण, अधिसूचनेद्वारे, केन्द्रीय सल्लागार समिती म्हणून ओळखली जाणारी समिती स्थापित करील.
२) केन्द्रीय सल्लागार समिती दोन सदस्यांची ज्यात प्रत्येक जण खाद्य उद्योग, कृषि, ग्राहक, संबंधित संशोधन संस्था आणि अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करतील आरि सर्व अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त यांची मिळून बनलेली असेल आणि वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष पदसिद्ध (पदिय) सदस्य असतील.
३) कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धउत्पादन, जैवतंत्रज्ञान, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, पर्यावरण आणि वने, अन्न प्रक्रिया उद्योग, आरोग्य, पंचायती राज, लघुउद्योग आणि अन्न आणि सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित सरकारी संस्था किंवा मंत्रालये किंवा केंद्र सरकारचे विभाग. केंद्रीय सल्लागार समितीशी चर्चा करण्यासाठी संघटना आणि सरकार मान्यताप्राप्त शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल.
४) मुख्य कार्यकारी अधिकारी केन्द्रीय सल्लागार समितीचे पदसिद्ध (पदेन) अध्यक्ष असतील;
५) केन्द्रीय सल्लागार समिती आपल्या कारभारात व व्यवहारात कार्यपद्धतीचे नियमांद्वारे निर्दिष्ट केल्याप्रमाणे अशा नियमांचे किंवा प्रक्रियेचे पालन करेल.
