Fssai कलम १०१ : अडचणी दूर करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १०१ :
अडचणी दूर करण्याची शक्ती :
या अधिनियमाच्या तरतुदी कार्यान्वित करण्यास कोणतीही अडचण आल्यास, केन्द्र सरकार राजपत्रात प्रतिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक वाटतील, या कायद्याशी विसंगत नसतील अशा तरतुदी करु शकेल :
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेनंतर तीन वर्षाच्या कालावधीनंतर या कलमाखाली कोणताही आदेश होऊ शकणार नाही.
२) या कलमाखाली दिलेला प्रत्येक आदेश, तो दिल्यापासून यथाशीघ्र, संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवला जाईल.

Leave a Reply